Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज इंग्लिश स्कूलमध्ये मराठी भाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्था संचलित शिवराज इंग्लिश स्कूलमध्ये मराठी राजभाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

सहाय्यक शिक्षक शरद कांबळे यांनी मराठी भाषेचे महत्त्व विशद केले. कु. सौफिया मकानदार हिने विज्ञान दिनाविषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून मराठी भाषेचे कौतुक केले. काही विद्यार्थिनींनी गाणी सादर केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी रॅली काढली.

दुपारी सर्व विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सदर प्रदर्शनाचे उदघाटन संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संदीप गवळी, योगेश चौगुले उपस्थित होते. या सर्व उपक्रमांसाठी मुख्याध्यापिका सौ.गौरी शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. आभार सौ.दिपिका यादव यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.