Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

एम.पी.एस.सी.परीक्षेतील यशाबद्दल रोहित आरबोळे यांचा सत्कार


गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी रोहित शशिकांत आरबोळे यांनी एम.पी.एस.सी.परीक्षेत राज्यात ७१ वा क्रमांक पटकाविल्याबद्दल शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी सत्कारमूर्ती रोहित आरबोळे यांनी एम.पी.एस.सी.अभ्यासाची सुरुवात मी शिवराज महाविद्यालयात असताना केली आहे. बी.एस्सीला असताना आमचे ठगरी सर यांनी मला महाविद्यालयात मार्गदर्शन केले. त्यामुळे या क्षेत्रातच करिअर करण्यासाठी मी प्रयत्नशील राहिलो. माझ्या या यशामध्ये शिवराज महाविद्यालयाचा मोलाचा वाटा आहे. शिवाय आम्हाला सतत प्रेरणा देणाऱ्या आमच्या शिवराज महाविद्यालयाचे नाव उज्वल करणार असल्याचे सांगून एम.पी.एस.सी.मध्ये करिअर करू पाहणार्‍या शिवराज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास नेहमीच सहकार्य करू असे श्री.आरबोळे यांनी स्पष्ट केले.

शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिल कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी मार्गदर्शन करून रोहित आरबोळे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी एम.के.चितारी, फार्मसीचे प्राचार्य राहुल जाधव, प्रा. के. एस. देसाई, प्रा.रवी खोत, प्रा.विक्रम शिंदे यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभागाचे प्रमुख प्रा.एन.बी.एकिले यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.