Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महिलांनी आपली स्वतःची ओळख निर्माण करावी: प्रा. श्रुती पाटील

संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात 


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
महिलांनी आपली स्वतःची ओळख निर्माण करावी. आपला स्वाभिमान जागृत ठेवावा असे आवाहन शिवराज महाविद्यालयाच्या प्रा. श्रुती पाटील यांनी केले. संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एच.सावंत होते.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून रांगोळी, मेहंदी, पाककला, केशरचना स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कु. शिवानी पाटील हिने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास प्रा.ए.बी.फराकटे, प्रा.आर.एस.देसाई व सर्व महिला प्राध्यापक, शिक्षकेतर महिला कर्मचारी उपस्थित होत्या.

कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रा. एन.आर.देसाई, प्रा. एन.बी.पठाण, प्रा.जी.बी. कलखांबकर, प्रा.एम.एन.पाटील, प्रा.एस.एस.सूर्यवंशी, प्रा. के.एस. काळगे, प्रा.एस.एस.पाटील, प्रा. पी.जी.सन्माने, प्रा.एम. एस. लोहार, भाग्यश्री पाटील यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. एस.बी.पोवार यांनी केले.आभार प्रा.ए. ए.देशपांडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.