Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज पोलीस निरीक्षक पदी गजानन सरगर यांची नियुक्ती


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
येथील पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदी गजानन सरगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सरगर यांनी सोमवारी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांची बदली झाल्यानंतर हे पद रिक्त होते. या पदाचा कार्यभार सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित दिवसे यांच्याकडे होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.दिवसे यांनी प्रभारी म्हणून उत्कृष्टरित्या कार्यभार संभाळला आहे. दरम्यान, सोमवारी पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांनी पदभार स्वीकारला. पोलीस निरीक्षक श्री. सरगर यांनी यापूर्वी गोरेगाव, कांदिवली, आंबोली येथे पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्याचबरोबर मुंबई येथील सीआयडी विभागात देखील उत्कृष्ट काम केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.