Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

धावकन्या सृष्टी रेडेकरचा सुळे ग्रामस्थांच्यावतीने मिरवणूक व सत्कार


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
सुळे गावची धावकन्या सृष्टी रेडेकर हिने नेपाळ येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेत २० वर्षाखालील मुलींच्या गटात सुवर्णपदक मिळवले. त्याबद्दल  सुळे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने भव्य मिरवणूक व सत्कार समारंभ आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी सरपंच छाया सूर्यवंशी होत्या. प्रास्ताविक ग्रा.पं.सदस्य संदीप चव्हाण यांनी केले.

तत्पूर्वी गावातील दत्त मंदिरापासून ग्रामदैवत भावेश्वरी मंदिरापर्यंत उघड्या जीपमधून ढोल - ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत प्राथमिक शाळेचे विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कार्यक्रमांस्थळी सृष्टी रेडेकर हिचा सरपंच छाया सूर्यवंशी गावातील वेगवेगळी मंडळे व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अशोक नांदुलकर, राजाराम जाधव, राजेंद्र राठोड यांनी मनोगत व्यक्त केले. सृष्टी रेडेकर हिने सत्काराबद्दल सुळे ग्रामस्थाबद्दल ऋण व्यक्त करत हा सत्कार पुढील स्पर्धेसाठी प्रेरणादायी ठरेल असे मत व्यक्त केले.

यावेळी उपसरपंच सतिश फडके, ग्रा. प. सदस्य शिवाजी सुतार, जयश्री फडके,शिल्पा डोंगरे, शांताबाई सुतार, श्रीधर रेडेकर, परशराम मांगले, राजेंद्र इंजल , नारायण मांगले, संभाजी रेडेकर,अमित फडके, विशाल पोवार यांच्यासह आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, प्राथमिक शाळेतील शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.