गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथील राजा शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये शिवराज अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत "ई- शासन" व "डिजिटल इंडिया" या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमास संस्था सचिव बी.ए.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेचे उदघाटन प्राचार्य डॉ. जाधव यांच्या हस्ते रोपाला जलार्पण करून करण्यात आले. यावेळी त्यांनी काळाच्या ओघाबरोबर नवनवीन प्रणालींचा स्वीकार केला पाहिजे. सर्व शासकीय यंत्रणांमध्ये आता डिजिटल पद्धतीचा वापर वाढत असून तो सर्वांनी स्वीकारत वाटचाल केली पाहिजे असे प्रतिपादन केले. प्रथम सत्रामध्ये शिवराज महाविद्यालयातील संगणक विभाग प्रमुख प्रा.अमित कुलकर्णी यांनी भारतातील डिजिटल इंडियाचा वाढता प्रसार, लोकांच्या सोयी- सुविधा, मोबाईल मधील विविध ॲप याविषयी मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रामध्ये प्रा. डॉ.वैजनाथ सूर्यवंशी यांनी सामान्य जनता आणि शिक्षण व्यवस्थेत डिजिटल स्वरूप कसे वाढत आहे याविषयी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक समन्वयक प्रा. डी.जी. कापुरे यांनी तर सूत्रसंचालन प्रा.संजीवनी कदम व डॉ.सुगंधा घरपणकर यांनी केले. आभार प्रा.किशोर पाटील व वैशाली पाटील यांनी मानले. या कार्यशाळेस गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेसाठी संस्थाध्यक्ष बाळासाहेब कुपेकर यांची प्रेरणा लाभली.
कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रा.मानाजीराव शिंदे, प्रा.दिलीप काळे, प्रा. डॉ. केशव देशमुख, प्रा.रचना मुसाई, प्रा.एन.आर.पाटील यांनी परिश्रम घेतले.

