Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज महाविद्यालयात आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन


गडहिग्लज (प्रतिनिधी):
  शिवराज महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्यावतीने महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली.

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.जी.जी.गायकवाड यांनी केले. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. एस.एम.कदम यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे व कार्यालयीन क्लार्क नेताजी कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी डॉ.आर.पी.हेंडगे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. या कार्यक्रमास ग्रंथपाल संदीप कुराडे, डॉ.एस.बी.माने यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय सेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.वृषाली हेरेकर यांनी केले.तर आभार डॉ. बी.एम.जाधव यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.