Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजमधील प्रश्नमंजुषा स्पर्धेत वैशाली कदम (कोल्हापूर) प्रथम, सरिता इनामदार (गारगोटी) व्दितीय

                                       (सर्व छायाचित्रे: मज्जिद किल्लेदार)

गडहिंग्लज (प्रतिनिधी):
येथील शिवराज महाविद्यालयात सुकन्या युथ फेस्टिवल यांच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक वैशाली कदम (कोल्हापूर) व सरिता इनामदार (गारगोटी) यांनी व्दितीय क्रमांक पटकाविला. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.सौ.बिनादेवी कुराडे तर प्रमुख अतिथी म्हणून विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. नीता चव्हाण उपस्थित होत्या. संस्थेचे सचिव डॉ.अनिल कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे आदींची प्रमुख उपस्थिती लाभली. स्पर्धेत २०० महिला व ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेते- निशिगंधा देशपांडे संकेश्वर, प्रा. सुनिता देसाई गडहिंग्लज, मुग्धा खोत तसेच विद्यार्थ्यांमध्ये प्रथम- रेवती बिडवे बी.ए.१, व्दितीय- सोहम सुतार बी.एस्सी.२, तृतीय -पल्लवी पाटील बी.सी.एस १, उत्तेजनार्थ अंकिता फगरे- बी.सी.एस ३, आदित्य पाटील अकरावी सायन्स.

या कार्यक्रमात मार्जी विद्यार्थिनी सरिता इनामदार यांनी मनोगत व्यक्त केले. ॲड. नीता चव्हाण, गगनबावडा कॉलेजच्या प्राचार्या सौ.विद्या पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास रेखा पोतदार, डॉ. परिणीता पाटील, मुख्याध्यापिका सौ.गौरी शिंदे, प्रा.सौ.पौर्णिमा कुराडे, डॉ.श्रद्धा पाटील, प्रा.सौ.दीपिका खांडेकर-पंडित, प्रा.मनीषा निलवे, प्रा. रेवती राजाराम, प्रा.तेजस्विनी शिंदे, सौ.सविता निकम यांच्यासह अन्य मान्यवर, सर्व महिला प्राध्यापिका, प्रशासकीय महिला कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.बियामा वाटंगी, प्रा. नाजिया बोजगर, प्रा.श्रुती पाटील यांनी केले. या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सुकन्या युथ फेस्टिवलच्या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.