गडहिंग्लज (प्रतिनिधी): लेखक दिनकर खवरे यांच्या "कथारत्न'' लघुकथा संग्रहाचे प्रकाशन येथील श्री संत बाळूमामा हालसिद्धनाथ मंदिर संस्थान मंदिराच्या सभामंडपात करण्यात आले.
या प्रकाशन सोहळ्यास जगद्गुरु पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी सिध्दसंस्थान मठ निडसोशी, पंचम निजलिंगेश्वर महाराज, राष्ट्रीय धर्माचार्य भगवानगिरी महाराज रामनाथगिरी समाधी मठ नूल, प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार ऋषिकेत शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वागत व प्रास्ताविक मंदिर कमिटी अध्यक्ष रमेश रिंगणे यांनी केले. नंतर कथारत्न या कथासंग्रहातील भारतीय सैनिक, शेतकरी, शिक्षक, मैत्री व देशभक्ती अशा विविध विषयांवरील लेखनाबद्दल प.पू.शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी गौरवोद्गार काढले. प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे व तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी पुढील लेखनासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर कथारत्न व लेखक दिनकर खवरे यांच्या सुत्रसंचालन, शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती बसवराज आजरी यांनी सविस्तरपणे सांगितली.
सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत लेखक दिनकर खवरे लिखित कथारत्न या कथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. कथासंग्रह प्रकाशनानंतर बाळूमामा मंदिर समितीचे अध्यक्ष रमेश रिंगणे, उपाध्यक्ष विठ्ठल भमानगोळ, उद्योजक आनंदा चोथे, संदीप रिंगणे, अभियंता बाळासो गुरव, जयसिंग पवार, छायाचित्रकार मज्जिद किल्लेदार, राजू पोवळ, शिवाजी पाटील, जवाहर घुगरे, रावसाहेब कुरबेट्टी यांनी शुभेच्छा दिल्या. मंदिराचे सहसचिव चंद्रकांत सावंत यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.



