Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज महाविद्यालयात नॅक मूल्यांकनासाठी पीअर टीमची भेट



गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात नॅक बेंगलोर यांच्यावतीने पीअर टीमचे प्रमुख प्रोफेसर राजेश कुमार शर्मा, को-ऑर्डिनेटर प्रोफेसर परमजीत कौर- धिंडसा, डॉ. धनकुमार अंगडी यांनी भेट दिली.



पहिल्या दिवशी पीअर टीमचे महाविद्यालयात आगमन होताच महाविद्यालयाच्या वतीने प्रचार डॉ. एस.एम.कदम यांनी स्वागत केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, संस्थेचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष जे वाय बारदेस्कर, ॲड.  दिग्विजय कुराडे, बसवराज आजरी, श्री.नंदनवाडे, महाविद्यालयाचे नॅक विभागाचे समन्वयक प्रा. किशोर अदाटे यांच्यासह नॅक विभागाचे सर्व सदस्य उपस्थित होते.



स्वागतानंतर महाविद्यालयातील डॉ. जे.पी.नाईक सभागृहात प्राचार्य डॉ. एस.एम.कदम यांच्यासह महाविद्यालयातील विविध विभागाच्या वतीने पेपर प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. दुपारी माजी विद्यार्थ्यांसोबत कमिटीने संवाद साधला. साहित्यिक डॉ. राजन गवस, सहाय्यक पोलीस निरीक्षक भानुदास खटावकर, इस्त्राईल मधील संशोधक भगवान पाटील, गडहिंग्लज साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक विश्वास देसाई, जि.प.सदस्य ॲड. हेमंत कोलेकर, प्रकाशभाई पताडे, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष व गडहिंग्लज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाशराव चव्हाण, संघटना सचिव बसवराज आजरी, निवृत्त प्राध्यापिका विजयमाला घोलपे, ॲड. सतीश ईट्टी, डॉ. नागेश पट्टणशेट्टी, नंदकुमार शेळके यांच्यासह विविध क्षेत्रात कार्यरत असणारे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी उपस्थित होते.



तसेच महाविद्यालयाच्या नॅक विभाग, आजी विद्यार्थ्यांशीही त्यांनी संवाद साधला. तसेच संगणक विभाग, ग्रंथालय, क्रीडा व एन.सी.सी विभाग, प्रशासन विभाग तसेच अन्य विभागाची प्रत्यक्ष पाहणी केली. महाविद्यालयाच्या जिमखाना विभागामार्फत अखिल भारतीय मल्लखांब फेडरेशनचे सचिव नारायणराव कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी मल्लखांबची प्रात्यक्षिके सादर केली.



महाविद्यालयाच्या रंगमंचावर सांस्कृतिक कार्यक्रमाचा प्रारंभ सपना सावंत या विद्यार्थिनीच्या सुरेल आवाजात गायलेल्या 'सत्यम शिवम सुंदरम..' ने झाली. महाविद्यालयाच्या  विद्यार्थी, विद्यार्थिनींनी मंगळागौर, जोगवा, गोंधळ, लावणी यासह लोककला व लोकगीतांवर नृत्यातून महाराष्ट्रीय लोककला व लोकगीतांची रंगत वाढवली. तसेच अर्णव बुवा यांच्या सुरेल गायनाबरोबरच अन्य कलाकारांच्या तबला, हार्मोनियम, बासरी वादनातून 'कट्यार काळजात घुसली' मधील जुगलबंदी औरच रंगली. विद्यार्थ्यांचा लोककलेचा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.




दोन दिवसाच्या भेटीनंतर सांगता कार्यक्रमांमध्ये पीअर टीमचे प्रमुख प्रोफेसर राकेशकुमार शर्मा, को-ऑर्डिनेटर प्रोफेसर परमजीत कौर-धिंडसा, डॉ. धनकुमार अंगडी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पीअर टीमच्या वतीने प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, संस्था सचिव डॉ.अनिल कुराडे यांच्याकडे अहवाल सुपूर्द करण्यात आला. यावेळी नॅक विभागाचे समन्वयक प्रा.किशोर अदाटे, रजिस्ट्रार डॉ. संतोष शहापूरकर, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक उपस्थित होते. प्रा.एन.बी. ईकीले यांनी सूत्रसंचालन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.