Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अकोले ते लोणी पायी मोर्चात देवस्थान जमीनधारक सहभागी होणार

उत्तुरला मेळाव्यात देवस्थान जमीनधारकांचा निर्धार 

          




आजरा : उत्तुर  (ता. आजरा) येथील हनुमान मंदिर येथे आजरा तालुक्यातील देवस्थान जमीनधारकांचा मेळावा पार पडला. कॉम्रेड शिवाजी गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा पार पडला.

        


वर्षानुवर्षं देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या कराव्यात या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली देवस्थान जमीनधारक शेतकरी लढा देत आहेत. गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या या लढ्याला काही प्रमाणात यश आले आहे. विधिमंडळामध्ये देवस्थान जमिनी शेतकऱ्यांच्या मालकीच्या कायमस्वरूपी करण्याबाबतचे विधेयक देखील मंजूर झाले आहे. मात्र त्याचे कायद्यात रूपांतर होणे गरजेचे आहे. यासाठी देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांचा राज्यस्तरीय मोर्चा  दि.26 ते 28 एप्रिल रोजी  अकोले (जि.अहमदनगर) ते लोणी (जि.पुणे) पायी लाँग मार्च अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली महसूल मंत्र्यांच्या कार्यालयावर निघणार आहे.




या मोर्चामध्ये राज्यभरातून देवस्थान जमीनधारक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. आजरा, गडहिंग्लज, चंदगड तालुक्यातील देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी व त्याबाबत नियोजनासाठी उत्तुर येथे हा मेळावा पार पडला. मेळाव्यामध्ये कॉ. शिवाजी गुरव, कॉ.बाळासाहेब कामते, अंबाजी गुरव, विजय सावेकर, विठ्ठल नांदवडेकर, विशाल गुरव, सुनील सावंत, दिनकर सावंत, शिवाजी आजगेकर, तानाजी आजगेकर, गौरव धुमे, निवृत्ती आजगेकर, प्रमोद गुरव, संजय गुरव, आनंद बुवा, मधुकर गुरव, मारुती गुरव यांच्यासह मुमेवाडी, पेंढारवाडी, उत्तुर, धामणे, वझरे, आरदाळ,भादवण या गावांसह गडहिंग्लज, कागल, चंदगड तालुक्यातील शेतकरी देखिल उपस्थित होते.




आजरा तालुक्यातील देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांनी मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी अंबाजी गुरव (धामणे) 8793547060 यांच्याशी संपर्क साधावा व मोठ्या संख्येने देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांनी या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी केले आहे.


बातमीचा व्हिडिओ येथे पहा 👇🏼




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.