Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संत गजानन अभियांत्रिकीत 'नवप्रवर्त्य -२३'उत्साहात

महागाव: येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांचे स्वागत करताना ॲड. बाळासाहेब चव्हाण शेजारच्या डॉ. व्हि. एन. शिंदे, डॉ. एस. एच. सावंत.


गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात नवप्रवर्त्य -२३ हा तंत्रशिक्षणाशी निगडित प्रणालीवर आधारित कार्यक्रम उत्साह झाला. प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाचे प्र. रजिस्टार डॉ. व्हि.एन. शिंदे  व पोलीस निरीक्षक गजानन सरगर हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ॲड. बाळासाहेब चव्हाण हे होते.




प्राचार्य डॉ. एस.एच.सावंत यांनी स्वागत प्रस्तावना करून स्पर्धेचे उद्देश व महत्त्व विशद केले. यामध्ये पेपर व पोस्टर प्रेझेंटेशन, टेक्नो डॉक, कोड वॉर या विभागात स्पर्धा झाल्या. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातून चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.




यावेळी प्रमोद फराकटे ,जयवंत वरपे, डॉ.एस. जे.कदम, डॉ. के. आर. देसाई, सुभाष कुलकर्णी, ए.एस.कुलकर्णी, प्रा. अतुल गावडे यासह सर्व विभाग प्रमुख शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. स्पर्धा समन्वयक म्हणून प्रा. एस. आय. जबडे व प्रा. एस. एस.गुरव यांनी काम पाहिले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.