गडहिंग्लज (प्रतिनिधी): जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महागाव येथील संत गजानन महाराज मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमधील रुग्णांना राष्ट्रीय युवक काँग्रेस कमिटी गडहिंग्लज मार्फत फळे वाटप करण्यात आले.
यावेळी डॉ. यशवंत चव्हाण, प्रा. अजिंक्य चव्हाण, विद्याधर गुरबे, अजित बंदी, पुरुषोत्तम चव्हाण, वीरसिंग बिलावर, प्रशांत पाटील, अनिल वळतकर, बाळासो शिंदे, राजू चव्हाण व कमिटीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

