Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात



गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२  वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.




यावेळी मॅरेथॉन स्पर्धा, हातात कासरा धरुन बैल पळविणे यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी हसुरवाडी येथून भीमज्योत आणण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन उपसरपंच सलीम यमकनमर्डी व युवा उद्योजक सुमित सगांज यांच्या हस्ते  करण्यात आले.




याप्रसंगी पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांनी युवकांना मार्गदर्शन केले. कलाम फौंडेशन व मुस्लिम बांधवांच्या वतीने समाज मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे झाली.




डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती. महिलांनी केलेला ड्रेस कोड व तरुणांनी दुचाकीवर लावलेले झेंडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. माता रमाई मंडळ, चिमुकल्यांचे झांज पथक, बँड पथक लक्षवेधी ठरले.




यावेळी विजय शेरवी, शिवानंद मठपती, सुजित पाटील, चंद्रकांत जांगणुरे, अमरदीप व्हसकोटी, गौतम सन्माने, अविनाश दुध्यागोळ, चंद्रकांत गुरुवानगोळ, काशिनाथ रवेदार, गजानन सुरनाईक, प्रेम मऱ्यापगोळ, नागेश म्हेत्री, संतोष सुरनाईक, रोहित चीकबसर्गे, उमेश सुरनाईक, विजय ढंगणावर, बाबू करोशी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.