Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची परीक्षा 13 प्रादेशिक भाषांमध्ये देता येणार



नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण निर्णय घेत केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलासाठी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षा घेण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये स्थानिक तरुणांच्या सहभागाला चालना देण्यासाठी आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या पुढाकाराने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त प्रश्नपत्रिका आसामी, बंगाली, गुजराती, मराठी, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलुगू, ओडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी, कोंकणी भाषांमध्ये तयार केले जाणार आहे



कॉन्स्टेबल जीडी ही कर्मचारी निवड आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या प्रमुख परीक्षांपैकी एक असून देशभरातून लाखो उमेदवार ही परीक्षा देण्यासाठी उत्सुक असतात. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये 1 जानेवारी 2024 पासून परीक्षा घेतली जाईल.



 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.