Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

लघुपट निर्मिती हे रोजगार मिळवून देण्याचे साधन

लघु चित्रपटकार जलालुद्दीन बाबा यांचे मत 


संत गजानन अभियांत्रिकीमध्ये लघुपट कार्यशाळेचे आयोजन 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): शिक्षणातील संकल्पना, निसर्गातील गोष्टी, सामाजिक समस्या, विज्ञान संशोधन समजेल अशा स्वरूपात मांडून विज्ञानाच्या साह्याने आपल्यातील ज्ञानाच्या जोरावर परिसरातली माहिती जगासमोर आणली पाहिजे. त्यासाठी लघुपट हे प्रभावी माध्यम आहे. युवकांच्यात त्याची निर्मिती करताना संवेदनशीलता हवी. तसेच याकडे रोजगार निर्मितीचे साधन म्हणून पहावे. असे मत जम्मू- काश्मीर येथील लघु चित्रपटकार, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त जलालुद्दीन बाबा  यांनी व्यक्त केले.

           

महागाव येथील संत गजानन अभियांत्रिकीमध्ये आयोजित कार्यशाळेत प्रमुख पाहुणे व तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय सावंत होते. कोल्हापूरचे फिल्म मेकिंग संचालक अतुल गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

  

२७  ते २९ एप्रिल या तीन दिवसात कालावधीत लघुपट निर्मिती कार्यशाळेचे आयोजन केले होते. जलालुद्दीन बाबा यांचा  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्याचा उल्लेखा 'मन की बात' या कार्यक्रमात केला होता. शिवाय त्यांना भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाने गौरविले आहे. नुकताच त्यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. सध्या ते नॅशनल जिओग्राफिक संस्थेबरोबर कार्यरत आहेत. त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.




प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस. एच. सावंत यांनी केले. प्राचार्य डॉ सावंत म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना एखाद्या शाखेतून पदवी संपादन करत असताना आपल्याकडे एखादे कौशल असेल तर त्यामध्येही शिक्षण घेता येणार आहे. हाच दृष्टिकोन समोर ठेवून कॉलेजने लघुपट निर्मितीवर ही कार्यशाळा आयोजित केली आहे. दोन ते तीन महिन्यात यासाठी लागणाऱ्या साहित्याची उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.  

 

२७ ते२९ एप्रिल या तीन दिवसाच्या कार्यशाळेत लघुपट कसा करावा, कोणता विषय निवडावा, कोणती उपकरणे वापरावीत, कोणती आधुनिक तंत्रज्ञान व कौशल्याचा वापर करावा याची प्रत्यक्ष माहिती व प्रात्यक्षिके करून दाखवण्यात दाखली. या कार्यशाळेत पन्नासपेक्षा जास्त फार्मसी, बी.ए. एम.एस, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.




समन्वयक म्हणून प्रा. डी. जे. मोरे, प्रा. सौ. एम. एन. पाटील यांनी काम पाहिले. सुत्रसंचालन प्रा. ए. ए. सुतार यांनी केले. प्राचार्य एस. एच. सावंत यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. आभार प्रा.डी.जे मोरे यांनी मानले. या कार्यशाळेस संत गजानन शिक्षण समूहाचे अध्यक्ष ॲड. डॉ.आण्णासाहेब चव्हाण, विश्वस्त डॉ. यशवंत चव्हाण, डॉ.संजय चव्हाण, संस्था सचिव ॲड.बाळासाहेब चव्हाण, डॉ. प्रतिभा चव्हाण व डॉ. सुरेखा चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.