गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी येथील सान्वी प्रसन्ना चौगुले हिने नेपाळ येथील पोखरा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविल्यानंतर आता दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत रौप्य पदक पटकावत यशाची घोडदौड तिने सुरूच ठेवली आहे. सान्वी ही वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसन्ना चौगुले यांची कन्या आहे. सान्वीचे हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे.
सान्वीचे शिक्षण हे शंकरलिंग सीबीएससी स्कूल चिकालगुड येथून झाले आहे. कराटेचे प्रशिक्षण के.एस.वॉरियर्स ॲकॅडमीतून तिने घेतले आहे. लहानपणापासूनच खेळाची चांगली आवड असल्याने सान्वीने जिद्द व चिकाटीच्या जोरावर अथक परिश्रम घेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे नावलौकिक केले आहे. आता दिल्ली येथे झालेल्या कराटे स्पर्धेत देखील सान्वीने रौप्य पदक पटवत यशाचा आलेख उंचावला आहे. तिला के.एस.वॉरियर्स ॲकॅडमीच्या अध्यक्ष सौ कीर्ती इंगोले- पाटील, जनरल सेक्रेटरी श्री इंगोले- पाटील, प्रशिक्षक गजेंद्रसिंग ठाकूर यांचे मार्गदर्शन तर आई-वडिलांचे प्रोत्साहन लाभले.


