Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणी येथे माजी सैनिक संघटनेकडून ४ मे रोजी भव्य लावणी कार्यक्रम



गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणी येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी व श्री करनाईक यात्रेनिमित्त दिनांक ४ मे रोजी रात्री दहा वाजता बस स्टँड जवळील छत्रपती शिवाजी चौक येथे भव्य लावणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


तेरणी येथील श्री महालक्ष्मी देवीची व श्री करनाईक देवाची यात्रा दिनांक २ ते ६ मे  या कालावधीत संपन्न होत आहे. यानिमित्त येथील माजी सैनिक संघटनेच्या वतीने दिनांक ४ मे रोजी हा लावणी कार्यक्रम आयोजित केला आहे.


लावणी कार्यक्रम श्रीनाथ भैरव प्रोडक्शन सखी स्मृती प्रस्तुत सौ माधुरी बडदे निर्मित आहे. स्वप्नसुंदरी स्मृती बडदे आणि ढोलकीच्या तालावर फेम ऐश्वर्या बडदे यांच्यासह अन्य कलाकारांचा या लावणी कार्यक्रमात समावेश असणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन माजी सैनिक संघटनेकडून करण्यात आले आहे.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.