गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज- चंदगड राज्य मार्गावर लाकूडवाडी घाटात बुधवारी रात्री झालेल्या अपघातात महागावच्या युवकाचा मृत्यू झाला. सिद्धेश महादेव जाधव ( वय २३ )असे त्याचे नाव आहे.
मिळालेली अधिक माहिती अशी की, हेळेवाडीची यात्रा असल्याने सिद्धेश आपल्या मित्राकडे जेवणासाठी दुचाकीवरून गेला होता. जेवण उरकून महागावला आपल्या घरी दुचाकीवरून येत असताना लाकूडवाडी घाटात दुचाकी वरून पडून सदर युवक जखमी झाला.रस्त्यावरील प्रवाशांनी नातेवाईकांना माहिती दिली. रुग्णवाहिकेमधून रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.
सिद्धेशचा दोनच दिवसांपूर्वी वाढदिवस व ॲनिमेशन कोर्सचा निकाल लागला होता. त्याच्या निधनाने महागाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हरळी खुर्द येथील हिरण्यकेशी विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक महादेव जाधव यांचे ते चिरंजीव होत. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण व आजी असा परिवार आहे.

