Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नेसरी परिसरात नागरी वस्तीत फिरणाऱ्या हत्तीला सुरक्षितस्थळी पाठवा

ठाकरे गट शिवसेनेचे वन अधिकाऱ्यांना निवेदन  





गडहिंग्लज (प्रतिनिधी): नेसरी परिसरात नागरी वस्तीत फिरणाऱ्या हत्तीला वनविभागाच्या हद्दीत सुरक्षित स्थळी पाठवावे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उप वनसंरक्षक गुरुप्रसाद यांच्या नावे गडहिंग्लज येथील वन विभाग कार्यालयाकडे निवेदनातून केली आहे. सदर निवेदन शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले आहे


या निवेदनात म्हटले आहे की,  गडहिंग्लज तालुक्‍यात लिंगनूर तर्फ नेसरी व दुगूनवाडी या गावांमध्ये भर दिवसा हत्तीने प्रवेश केला आहे. २५ एप्रिलच्या रात्रीपासुन हा हत्ती नागरी वस्तीत फिरत आहे. दुगूनवाडी गावातून रात्री मुंगूरवाडी गावाजवळील ओढयातून लिंगनूर तर्फ नेसरी या गावात हत्तीने प्रवेश केला व सकाळी ११ नंतर हत्ती लिंगनूरहून हेब्बाळ-जलद्याळ, मांगनूर तर्फ सावतवाडी येथे गेला असून ही बाब अत्यंत गंभीर आहे. यामुळे वनविभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. वन्य प्राण्यांचा चारा कुठे गेला, वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी केलेली वनतळे कुठे गायब झाली ? याचा शोध घेणे गरजेचे आहे. असा सवाल देखील या निवेदनातून शिवसेनेने केला आहे. हत्तीला सुरक्षित ठिकाणी पाठवणे वनविभागाचे काम आहे. याकडे लक्ष वेधले आहे.

नेसरी परिसरात नागरी वस्तीत फिरणाऱ्या हत्तीला वनविभागाच्या हद्दीत सुरक्षित स्थळी पाठावावे, नागरी वस्तीतील हत्तींना प्रतिबंध करण्यासाठी वन हद्दीत शेततळी करावेत व प्राण्यांना पुरेसा चारा उपलब्ध करावा, हत्ती नागरी वस्तीत येऊ नये यासाठी वन विभागाने रात्रंदिवस गस्त घालावी व हत्ती नागरी वस्तीत आल्यास वन हद्दीत पाठविण्यात यावे आदी मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.





यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे, रियाजभाई शमनजी, संतोष चिकोडे, प्रतीक क्षीरसागर, अवधूत पाटील, वसंत नाईक, भरत जाधव, शालन नांगनुरे, संजीवनी नांगनुरे, प्रशांत घबाडे, चंद्रकांत खवणे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.