कल्याण- चंदगड बस सुरु करण्याबाबतही आगार व्यवस्थापकांशी शिवसह्याद्री प्रतिष्ठानची चर्चा
कल्याण : कल्याण ते कोल्हापूर ही बससेवा दिनांक २१ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात आली आहे.
शिवसह्याद्री प्रतिष्ठाण कल्याण विभाग यांनी कल्याण आगार व्यवस्थापक श्री गायकवाड यांची भेट घेऊन कल्याण- चंदगड बस सुरु करण्याबाबत चर्चा केली. चंदगड पर्यत सध्या चालू करण्यास अडचणी आसल्याचे सागण्यात आले. मात्र २१ पासून कल्याण ते कोल्हापूर ही बस चालू करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. यासाठी उद्यापासून ऑनलाईन बुकीग सेवा उपलब्ध होणार आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर विभागातील नागरिकानी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

