उद्या सकाळी ८ वाजता बसर्गे येथे होणार अंत्यसंस्कार
गडहिंग्लज : बसर्गे येथील सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण नाईक (वय ५९) यांचे आज मुंबई येथे निधन झाले. त्यांचे पार्थिव मुंबई येथून बसर्गे येथे आणण्यात येत असून उद्या दिनांक 20 रोजी सकाळी आठ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अरुण नाईक हे मुंबई पोलीस दलात सेवेत होते. माहीम येथील पोलीस ठाण्यातून प्रदीर्घ सेवेनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावरून ते सेवानिवृत्त झाले होते. या कालावधीत त्यांनी पोलीस खात्यात उत्कृष्ट सेवा बजावली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, पाच भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. गडहिंग्लज पंचायत समितीचे माजी सदस्य व जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक यांचे ते बंधू होत.

