Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सुळे येथील आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद



आजरा : ग्रामपंचायत सुळे व ज्ञानदीप बहुउद्देशीय सेवा संस्था बसरेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने १५ व्या वित्त आयोगातून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात ९२ लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

      


शिबिराचे उदघाटन तंटामुक्तीचे उपाध्यक्ष संभाजी रेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच छाया सूर्यवंशी, उपसरपंच सतिश फडके, ज्ञानदीप बहुउद्देशीय सेवा संस्थेचे अध्यक्ष मोहन पाटील उपस्थित होते.

      


या शिबिरात कोल्हापूर येथील अथायु हॉस्पिटलमधील डॉ. ओंकार नाईक, डॉ. उदय सूर्यवंशी, ज्योती स्वामी, सारिका मोरे, शुभांगी गुरव, कोमल बुवा, उल्हास कागिलकर यांनी  हिमोग्लोबिन तपासणी, ज्येष्ठ लोकांची आरोग्य तपासणी, जनरल तपासणी, नेत्र तपासणी आदी तपासण्या मोफत केल्या.

       



आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी ग्रा.पं. सदस्य संदिप चव्हाण, शिवाजी सुतार, जयश्री फडके, शिल्पा डोंगरे ,शांता सुतार, ग्रामसेवक सागर किरुळकर  राजाराम जाधव, संदिप सुर्यवंशी, अमित फडके, विशाल पोवार, नारायण मांगले, आरोग्य सेविका अमृता यादव,  सुषमा गडकरी, आशा स्वयंसेविका सुरेखा सुतार, मदतनिस, ग्रामपंचायत कर्मचारी व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.