गडहिंग्लज (प्रतिनिधी): किल्ले सामानगडला जिल्हा वन अधिकारी जी गुरुप्रसाद यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी सामानगड परिसराची संपूर्ण माहिती घेतली.
सामानगड परिसरातील विविध समस्या संदर्भात चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील, गडहिंग्लज पंचायत समितीचे माजी सभापती अमर चव्हाण, नौकुडचे सरपंच शुक्राचार्य चोथे, अभियंता के. टी. शेलार यांनी नुकतेच जिल्हा वन अधिकारी जी गुरुप्रसाद यांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधले होते. त्यांना सामानगडला भेट द्यावे असेे सुचवले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा वन अधिकारी गुरुप्रसाद यांनी सामानगडला भेट देत माहिती घेतली.
यावेळी त्यांनी किल्ले सामानगड परिसरातील वनक्षेत्र, किल्ला परिसर, मंदिर, रस्ते यांची पाहणी केली. तसेच येथील संपुर्ण परिसराची माहिती जाणून घेतली.
यावेळी त्यांच्या सोबत आजरा वनक्षेत्रपाल एस.आर. ढाके, गडहिंग्लजचे वनपाल पी.जी. वारंग, हसुरसासगिरीचे वनरक्षक आर.जी.पाटील, मासेवाडीचे वनरक्षक एस.एस.भंडारे, अभियंता के. टी.शेलार, माजी सभापती अमर चव्हाण, नौकुडचे सरपंच शुक्राचार्य चोथे, चिंचेवाडीचे उपसरपंच सर्जेराव कदम, शिवानंद मठपती, सतीश चव्हाण, जयवंत बिरंजे यांच्यासह सामानगड परिसरातील नागरिक उपस्थित होते.




