गडहिंग्लज: नौकुड येथील प्रतिष्ठित, शेतकरी विष्णू बाळकु चव्हाण (वय ६८ )यांचे भर उन्हात शेतात काम करत असताना आकस्मिक निधन झाले.
विष्णू चव्हाण हे भर उन्हात आपल्या शेतात काम करत होते. सायंकाळी अचानक त्यांना चक्कर आली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. चव्हाण यांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
चव्हाण हे गावातील प्रत्येक धार्मिक आणि सामाजिक कार्यात नेहमी सहभागी असायचे. नौकुडच्या महालक्ष्मी दूध संस्थेमधील त्यांचे कार्य उल्लेखनीय होते.

