Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत हलकर्णीच्या सान्वी चौगुले हिला सुवर्ण पदक



गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी येथील सान्वी प्रसन्ना चौगुले हिने नेपाळ येथील पोखरा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. सान्वी ही वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसन्ना चौगुले यांची कन्या आहे. सान्वीच्या या यशाने गडहिंग्लज तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. 



सान्वीचे शिक्षण हे शंकरलिंग सीबीएससी स्कूल चिकालगुड येथून झाले आहे. लहानपणापासूनच खेळाची चांगली आवड असल्याने सान्वीने जिद्द व चिकाटीच्या जोरावर अथक परिश्रम घेत  आंतरराष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे नावलौकिक केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. सान्वीला आई-वडिलांकडून प्रोत्साहन लाभले.






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.