आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मिळविले नेत्रदीपक यश
पुणे (प्रतिनिधी): के.एस.वॉरियर्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी नेपाळ येथील पोखरा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत नेत्रदीपक यश संपादन केले. यामध्ये सान्वी चौगुले, अपेक्षा चौधरी, आयन चौधरी, समीक्षा ठाकरे, रोहिणी मिश्रा यांनी सुवर्णपदक (गोल्ड मेडल) तर सुजल ठाकरेने रौप्य पदक (सिल्व्हर मेडल) मिळविले.
या सर्व विद्यार्थ्यांना के.एस. वॉरियर्स अकॅडमीच्या अध्यक्षा सौ. कीर्ती इंगोले पाटील, जनरल सेक्रेटरी श्री इंगोले पाटील यांचे मार्गदर्शन व पालकांचे प्रोत्साहन लाभले. या स्पर्धेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेसाठी मुलांना उत्कृष्टरित्या प्रशिक्षण देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवल्याने प्रशिक्षक श्री इंगोले पाटील, कीर्ती इंगोले पाटील यांचे विद्यार्थ्यांच्या पालकांनी आभार मानत समाधान व्यक्त केले.

