गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव (ता.गडहिंग्लज )येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शनिवार दि.१५ रोजी 'नवप्रवर्त्य २०२३'हा राष्ट्रीय स्तरावरील टेक्नोडॉक, पेपर प्रेजेन्टेशन, कोडवाॅर व प्रोजेक्ट स्पर्धा होणार आहेत.
या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्य व अद्ययावत ज्ञान अवगत व्हावे व त्या माध्यमातून नवीन उद्योजक,संशोधक निर्माण होण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. दरवर्षी या स्पर्धा महाविद्यालयामार्फत आयोजित करण्यात येतो. महाराष्ट्रासह, कर्नाटक व इतर शहरातून या स्पर्धेत हजारो विद्यार्थी सहभागी होत असतात.
स्पर्धेतील विजेत्याना रोख रक्कम बक्षिसाबरोबरच प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार असून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्राचार्य डॉ. संजय सावंत यांनी केले आहे.



