Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेज बारावी सायन्सचा १०० टक्के निकाल



गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेज बारावी सायन्स विभागाचा १०० टक्के, बारावी कॉमर्स विभागाचा ९८.२४ टक्के तर बारावी आर्ट्स विभागाचा ७७.९२ टक्के निकाल लागला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.



महाविद्यालयात विभाग निहाय गुणानुक्रमे यशस्वी झालेले विद्यार्थी असे -


बारावी सायन्स- गावडे अमोल कृष्ण -७४.८३, शुभम भीमराव तराळ-७४.३३, कृष्णा संजीव सिंग-७४.१७, सुहाना मुबारक पटेल-७४.१७, प्रथमेश पांडुरंग नांदवडेकर-७४, हर्षवर्धन ईश्वर देसाई ७३.८३ टक्के गुण मिळविले.



बारावी कॉमर्स - श्रेया सचिन झुटाळ ८५.३३, रोहिणी शिवाजी जाधव - ८२.५०, अंकिता चंद्रकांत चव्हाण-७९.३३, रेगडे प्रेम गजानन--७९.६७, सानिका सुरेश शिवबुगडे-७८.५० टक्के गुण मिळविले. या विभागामध्ये १६९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते पैकी ९ विद्यार्थी डीस्टिंगक्‍शनमध्ये, ४२ प्रथम , व्दितीय श्रेणीत ८७ व उत्तीर्ण श्रेणीत ३० विद्यार्थी आहेत.



बारावी आर्टस- श्रेयस बाळू इजल ७५.१७, श्रेया संजय पाटील -६८.८३, धनश्री अनिल व्हरांबळे-६७.५०, प्राची हरी पाटणे-६२.३३ दर्शना दिनकर पाटील-६२ टक्के गुण मिळवून गुणानुक्रमे उत्तीर्ण झाले आहेत.



या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे,  सचिव डॉ.अनिल कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांचे प्रोत्साहन तर पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले व ज्युनिअर विभागाच्या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.