
तेरणी : येथील युवकांना टी-शर्ट वाटप प्रसंगी ठाकरे गट शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते व माजी विभाग प्रमुख कल्लाप्पा मगदूम.
गडहिंग्लज (प्रतिनिधी): ज्योतिर्लिंग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते डॉ. रियाजभाई शमनजी यांनी तेरणी येथील युवकांसाठी टी-शर्ट देऊन युवकांना यात्रेच्या शुभेच्छा दिल्या. सदर टी-शर्ट वाटप शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी विभाग प्रमुख कल्लाप्पा मगदूम यांच्या हस्ते करण्यात आले.
तेरणी येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी व श्री करनाईक देवाची यात्रा दिनांक २ ते ६ मे या कालावधीत पार पडत आहे. श्री महालक्ष्मी देवीची यात्रा नऊ वर्षानंतर संपन्न होत आहे. यानिमित्त गावात उत्साहाचे वातावरण आहे. यात्रेच्या पूर्वसंध्येला डॉ.रियाजभाई शमनजी यांनी तेरणी ग्रामस्थ यांच्यासह यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. गावातील युवकांचा यात्रेचा आनंद द्विगुणित करण्यासाठी डॉ.शमनजी यांनी युवकांना टी-शर्ट वाटप केले आहे.
बातमीचा व्हिडिओ येथे👇🏼 पहा
सदर टी-शर्ट वाटपाचा कार्यक्रम शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते कल्लाप्पा मगदूम यांच्या निवासस्थानी पार पडला. यावेळी बोलताना श्री. मगदूम म्हणाले, तेरणीचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवी व श्री करनाईक देवाच्या यात्रेनिमित्त डॉ. रियाजभाई शमनजी यांनी यांनी युवकांना मोफत टी-शर्ट वाटप करून यात्रेच्या आनंदात भर घातला आहे. हा त्यांचा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. यावेळी युवक उपस्थित होते.
डॉ. शमनजी यांनी यात्रेनिमित्त युवकांचा आनंद द्विगुणित केला : कल्लाप्पा मगदूम👇🏼

