
(संग्रहित छायाचित्र)
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : नौकुड येथे हत्तीचे दर्शन झाल्याने शेतकरी वर्गातून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्तीने नौकुड- हलकर्णी व हसुरसासगिरी रोडवरील ऊस पीक व आंब्याच्या झाडांचे नुकसान केले आहे. दरम्यान, नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन नौकुडचे सरपंच शुक्राचार्य चोथे यांनी केले आहे.
हसुरसासगिरी रोडवरील भरत कदम व हलकर्णी रोडवरील अमोल मांगले यांच्या शेतानजीक गुरुवारी सकाळी हत्तीचे दर्शन झाले आहे. या या हत्तीने या परिसरातील ऊस पिकाचे व आंब्याच्या झाडांचे नुकसान केले आहे. हलकर्णी परिसरातील नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन सरपंच शुक्राचार्य चोथे यांनी केले आहे.
तालुक्यातील दुगुनवाडी, लिंगनूर तर्फ नेसरी येथे आठवड्यापूर्वी भरवस्तीत हत्ती दाखल झाला होता. हुसकावल्यानंतर या हत्तीने पुढे मार्गक्रमण केले होते. त्यानंतर आता पुन्हा नौकुड येथे हत्तीचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
