Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नौकुडच्या प्रितम दिवटी याची कोल्हापूर जिल्हा क्रिकेट संघात निवड



गडहिंग्लज (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या बारा वर्षाखालील संघात नौकुड (भिमशाप्पा मठ, सामानगड ) येथील प्रितम भिमशाप्पा दिवटी याची निवड झाली आहे. असोसिएशनने ही निवड यादी जाहीर केली आहे. या निवडीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

कु. प्रितम हा गडहिंग्लज येथील जागृती हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. क्रिकेटचे प्रशिक्षण येथील हिरण्यकेशी फौंडेशनच्या माध्यमातून सुरू आहे. शाळेबरोबरच त्याला क्रिकेटचेही आवड असल्याने क्रिकेट खेळातही तो आपले करियर करत आहे. कोरोना महामारीच्या काळात मोबाईल पासून अलिप्त राहत त्याने आपला वेळ क्रिकेट खेळण्यात घालवला. या कालावधीत त्याने भिमशाप्पा मठ परिसरातील प्रांगणात मोठ्या प्रमाणात क्रिकेटचा सराव केला. हा सराव त्याने आजपर्यंत अखंडितपणे सुरू ठेवला आहे. याचेच फळ म्हणून त्याला आज जिल्हा संघात खेळण्याची संधी मिळाली. या अथक परिश्रमाच्या जोरावर त्याची निवड कोल्हापूर येथील क्रिकेट संघात झाली आहे.


प्रितम याला चेतन सावरे, गणेश माद्याळकर, सागर मेटके यांचे मार्गदर्शन तर वडील भिमशाप्पा दिवटी यांचे प्रोत्साहन लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.