गडहिंग्लज (प्रतिनिधी): नंदनवाड येथील शहीद जवान नायक नागोजी रामू मोरे यांना १९ ऑक्टोबर १९८७ रोजी ऑपरेशन पवन श्रीलंका (शांतीसेना) येथे वीरगती प्राप्त झाली. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ उभारलेल्या स्वागत कमानीचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शेवंता मगदूम होत्या.
प्रास्ताविक मुख्याध्यापक आनंदा वाघराळकर यांनी केले. प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. तहसीलदार ऋषीकेत शेळके, गटविकास अधिकारी शरद मगर, सैनिक संघटनेचे अध्यक्ष कुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते दीपक पुजारी, गीता घुगरे, कुमार पाटील, मधुकर येसने, गट विकास अधिकारी शरद मगर, तहसीलदार ऋषीकेत शेळके, यांची भाषणे झाली. वीरपत्नी श्रीमती इन्दुमती नागोजी मोरे यांचा सैनिक संघटनेकडून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास उपसरपंच तायगोंडा बोगरनाळ, शहाजी कापसे, महाबळेश्वर कापसे, निंगापा मगदूम, मधुकर पोवार,धर्मादाय अधीक्षक अरुण भुईंबर, प्रताप चव्हाण, बाळासाहेब थोरात, संतोष पाटील, भरमा तेरणी, प्रकाश देसाई,ग्रामसेवक दत्ता पाटील, तलाठी शिवपुत्र हिरेमठ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुष्पा दरेकर यांनी सुत्रसंचालन केले तर महेश घुगरे यांनी आभार मानले. पवनकुमार मोरे, सतीश शेंडगे, पवन येजरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
बातमीचा व्हिडिओ येथे पाहा 👇🏼


