Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज पूर्व भागात शेतकऱ्यांना युरिया खताचा अनियमित पुरवठा

नियमित खतपुरवठा करण्याची ठाकरे गट शिवसेनेची मागणी 


तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन




गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांना शेती सेवा केंद्रातून अनियमित युरिया खतपुरवठा होत असल्याने पूर्व मशागतीच्या कामांमध्ये अडचण निर्माण होत आहे. शेतकऱ्यांना युरिया खताचा नियमित पुरवठा करावा अशी मागणी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) वतीने तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन तालुकाप्रमुख दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.



या निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागातील हलकर्णी, हिटणी, खणदाळ परिसरातील शेतकऱ्यांना शेती सेवा केंद्रातून युरिया खताचा नियमित पुरवठा होत नाही. या भागातील शेती सेवा केंद्रांमध्ये युरिया खताची मागणी केली असता वरूनच तुटवडा आहे असे सांगितले जाते. या भागात ऊस क्षेत्र जास्त आहे.  तसेच नवीन पीक पेरणी हंगाम सुरू होत आहे. त्यासाठी शेतीची पूर्व मशागतीची कामे सुरू झाली आहेत. खताच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना अडचण निर्माण होत आहे. काही शेती सेवा केंद्रात खाते उपलब्ध आहेत मात्र त्या ठिकाणी इतर अनावश्यक खते  लिंकिंग पद्धतीने घेण्यास भाग पाडले जात आहे.



या प्रश्नी प्रशासनाने कृषी सेवा केंद्र चालकांची बैठक बोलावून खतपुरवठा सुरळीत करण्याची सूचना देण्यात यावी अन्यथा  तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनातून दिला आहे. निवेदनावर तालुकाप्रमुख दिलीप माने, उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी, अर्जुन पाटील, बसवराज स्वामी, बाळकृष्ण कडुकर, मज्जिद मणेर, बाबू घस्ती, विजय लक्याणावर, सुरेश संकपाळ, युवराज राऊत आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.