Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

श्रीमंत अजितसिंह निंबाळकर यांची तेरणीतील कल्लाप्पा मगदूम यांच्या घरी सदिच्छा भेट

तेरणी: येथील शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते कल्लाप्पा मगदूम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटीप्रसंगी श्रीमंत अजितसिंह निंबाळकर सरदेसाई यांच्यासह त्यांचे बंधू व मगदूम कुटुंबिय.

गडहिंग्लज (प्रतिनिधी):
चिकोडी तालुक्यातील नणदी येथील सरकार श्रीमंत अजितसिंह निंबाळकर सरदेसाई यांनी तेरणी येथील शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी विभागप्रमुख कल्लाप्पा मगदूम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.



तेरणी येथील श्री महालक्ष्मी व करनाईक देवाची यात्रा दिनांक २ ते ६ मे अखेर मोठ्या उत्साहात पार पडली. या यात्रेनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी श्रीमंत अजितसिंह निंबाळकर यांनी शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते कल्लाप्पा मगदूम यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.श्री. मगदूम यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी श्रीमंत अजितसिंह निंबाळकर यांनी तेरणी गावाची माहिती श्री मगदूम यांच्याकडून जाणून घेतली. यावेळी श्रीमंत निंबाळकर सरदेसाई यांचे नातेवाईक तसेच कल्लाप्पा मगदूम यांचे कुटुंबीय उपस्थित होते.




श्रीमंत अजितसिंह निंबाळकर सरदेसाई नणदीकर सरकार यांचे समाजाभिमुख व्यक्तिमत्व सर्वपरिचित आहे. त्याचबरोबर त्यांच्या घराण्याची  दानशूरपणाची ख्याती देखील पिढ्यानपिढ्या अखंडितपणे सुरू आहे. त्यांनी निडसोशी मठासाठी नणदी येथील १३ एकर ६ गुंठे व इतरत्र अशी एकूण २२ एकर, जोतिबा देवस्थान येथील नंदादीपासाठी किणी (हातकणंगले) येथील १३ एकर ३७ गुंठे, नृसिंहवाडी देवस्थान साठी सावळवाडी येथील १३ एकर २ गुंठे, सदलगा पिरासाठी २ एकर १२ गुंठे, चिक्कोडी पीर देवस्थानसाठी नागराळ येथील २२ एकर ३८ गुंठे, गजबरवाडी येथील पिरासाठी ७ एकर दोन गुंठे, तासगाव गणपती पंचायतनसाठी बागणी येथील १५ एकर १८ गुंठे, सावळवाडी येथील अकरा एकर सहा गुंठे, नंदी कुरळी मारुती देवालय पालखी नंदादीप सेवेसाठी २६ एकर तीन गुंठे, पंचलिंग देवस्थानसाठी २७ एकर ११ गुंठे, टाकळी येथील पहिल्या महायुद्धात हुतात्मा झालेल्या सैनिक कुटुंबियांसाठी दहा एकर अशा जमिनी नणदी संस्थानाकडून दान देण्यात आल्या आहेत. असे हे दानशूर व्यक्तिमत्व सर्वांना परिचित आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.