गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज विद्या संकुलाच्या विना-अनुदानित विभागाच्या ॲकेडेमिक डायरेक्टर' पदी डॉ.आर. एस. निळपणकर यांची निवड झाली असून नुकतेच ते या पदावर रुजू झाले आहेत.
प्रारंभी स्वागत पदव्युत्तर विभाग डॉ.सुधीर मुंज यांनी केले. या निवडीबद्दल डॉ.निळपणकर यांचा सत्कार शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिल कुराडे व प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांनी महाविद्यालयातील परंपरा व महाविद्यालयातील विविध उपक्रमशील प्रयोग तसेच विना-अनुदानित विभागाची सर्व माहिती दिली. डॉ. आर. एस. निळपणकर यांनी खरेतर शिवराज महाविद्यालय हे या उपविभागातील अग्रेसर महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या गौरवशाली परंपरेत आपल्या परीने सर्वतोपरी सहकार्य करण्याबरोबरच विद्यार्थी हिताचे सर्व उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले तसेच महाविद्यालयाच्या विकासात योगदान देणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी फार्मसीचे प्राचार्य डॉ.राहुल जाधव, बी. बी. ए. बिभाग प्रमुख डॉ. आर. डी. कमते, बी. सी. ए. विभाग प्रमुख प्रा. के. एस. देसाई, संगणक विभाग प्रमुख प्रा.दीपिका खांडेकर, बी.सी.एस. विभाग प्रमुख प्रा.रवी खोत, अँनिमेशन विभाग प्रमुख प्रा. बी.एस.पठाण, प्रा.एम.के.नोरेंज, प्रा.विक्रम शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक उपस्थित होते. विना-अनुदानित विभाग समन्वयक प्रा.आझाद पटेल यांनी आभार मानले.




