पाच महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के
सायन्समध्ये ६ तर कॉमर्समध्ये ५ महाविद्यालये 'लय भारी' ; शंभर टक्के निकाल
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी दुपारी जाहीर करण्यात आला. यामध्ये गडहिंग्लज तालुक्याचा 93.72 टक्के निकाल लागला. आजऱ्याचा 94. 54 तर चंदगड तालुक्याचा 92.28 टक्के इतका निकाल लागला. गडहिंग्लज तालुक्यातील पाच महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यंदा सायन्स व कॉमर्स विभागाचा निकाल सर्वाधिक लागल्याचे चित्र दिसून आले. सायन्स व कॉमर्स विभागात देखील बऱ्याच महाविद्यालयांचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे.
महाविद्यालय निहाय सविस्तर निकाल असा-
गडहिंग्लज तालुका -
संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेज गडहिंग्लज 94.11, एम आर जुनियर कॉलेज गडहिंग्लज 99.57, साधना हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज 99.59, जागृती जुनियर कॉलेज 93.93, गडहिंग्लज हायर सेकंडरी स्कूल 88.31, महात्मा फुले जुनिअर कॉलेज महागाव 92.59, छत्रपती शिवाजी जुनिअर कॉलेज नेसरी 97.08, हलकर्णी भाग हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज 76.74, राजा शिवछत्रपती आर्ट्स अँड कॉमर्स जुनिअर कॉलेज कानडेवाडी 89.06, न्यू इंग्लिश स्कूल अँड जुनिअर कॉलेज नूल 92.30, हिडदुग्गी हायस्कूल हिडदुग्गी अँड ज्युनिअर कॉलेज 81.81, राजर्षी शाहू ज्युनिअर कॉलेज गडहिंग्लज 67.85, श्री भावेश्वरी जुनियर कॉलेज हेब्बाळ जलद्याळ 86.36, केदारलिंग हायस्कूल व जुनिअर कॉलेज कडगाव 91.53, अशोक रावसाहेब देसाई जुनिअर कॉलेज तेरणी 79.41, भालचंद्र कुलकर्णी जुनिअर कॉलेज 97.33, श्री दुरदुंडेश्वर ज्युनिअर कॉलेज मुतनाळ 95. 09, क्रिएटिव्ह जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स गडहिंग्लज 100 टक्के, साई इंटरनॅशनल स्कूल अँड जुनिअर कॉलेज गडहिंग्लज 100 टक्के, सेंट झेवियर्स जुनिअर कॉलेज नेसरी 100 टक्के, मराठा मंदिर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स 93.93, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट साधना माळ 100 टक्के, साधना जुनिअर कॉलेज व्होकेशनल विभाग 93.06, जागृती जुनियर कॉलेज व्होकेशनल विभाग 94.38, हलकर्णी भाग जुनिअर कॉलेज व्होकेशनल विभाग 85.71, रुरल कॉलेज ऑफ पॅरामेडिकल एज्युकेशन व्होकेशनल 100 टक्के.
100 टक्के निकाल लागलेली गडहिंग्लज तालुक्यातील महाविद्यालये
क्रिएटिव्ह जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स गडहिंग्लज, साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सेंट झेवियर्स जुनिअर कॉलेज नेसरी, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट साधना माळ, रुरल कॉलेज ऑफ पॅरामेडिकल एज्युकेशन व्होकेशनल विभाग या महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
सायन्समध्ये शंभर टक्के निकाल लागलेली महाविद्यालये
संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेज गडहिंग्लज, छत्रपती शिवाजी जुनिअर कॉलेज नेसरी, न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज नूल, केदारलिंग हायस्कूल व जुनिअर कॉलेज कडगाव, भालचंद्र कुलकर्णी जुनिअर कॉलेज, श्री दुरदुंडेश्वर जुनिअर कॉलेज मुत्नाळ.
कॉमर्समध्ये शंभर टक्के निकाल लागलेली महाविद्यालये
साधना हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, महात्मा फुले जुनियर कॉलेज महागाव, छत्रपती शिवाजी जुनिअर कॉलेज नेसरी, हलकर्णी भाग हायस्कूल जुनिअर कॉलेज, न्यू इंग्लिश स्कूल अँड जुनिअर कॉलेज नूल.
आजरा तालुका
आजरा जुनिअर कॉलेज आजरा 94.60, जुनिअर कॉलेज उत्तुर 89.33, डॉ. झाकीर हुसेन जुनिअर कॉलेज 81.81, बापूसाहेब सरदेसाई जुनिअर कॉलेज निंगुडगे 79.16, व्यंकटराव हायस्कूल आजरा 98.23, आर्ट्स कॉमर्स जुनिअर कॉलेज आजरा 96.96, आजरा ज्युनिअर कॉलेज आजरा व्होकेशनल विभाग 97.95, ओम पॅरामेडिकल कॉलेज आजरा व्होकेशनल विभाग 94.54 टक्के.
आजरा तालुक्यात ओम पॅरामेडिकल कॉलेजच्या व्होकेशनल विभागाचा विभागाचा शंभर टक्के निकाल लागला आहे. तसेच कॉमर्समध्ये बापूसाहेब सरदेसाई जुनिअर कॉलेज निंगुडगे, आर्ट्स कॉमर्स जुनिअर कॉलेजचा शंभर टक्के निकाल लागला आहे. आर्ट्स मध्ये व्यंकटराव हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज तसेच आर्ट्स कॉमर्स जुनिअर कॉलेज या दोन महाविद्यालयांचा शंभर टक्के निकाल लागला आहे.
चंदगड तालुका
न्यू इंग्लिश स्कूल अँड एन बी पाटील जुनियर कॉलेज चंदगड 92.06, गुरुवर्य एम बी तुपारे जुनिअर कॉलेज कार्वे 88.72, वाय पी देसाई आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कोवाड 89.53, गुरुवर्य जी व्ही पाटील जुनिअर कॉलेज हलकर्णी 98.63, श्री रामलिंग हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज तुडये 87.20, श्री सरस्वती विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज कालकुंद्री 93.60, वाघमारे जुनिअर कॉलेज ढोलगरवाडी 70.58, धनंजय विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज नागणवाडी 100 टक्के, बागिलगे डुक्करवाडी विद्यालय अँड जुनिअर कॉलेज 88.88, छत्रपती शहाजी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पाटणे 73.91, श्री शिवशक्ती हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज अडकूर 88.23, छत्रपती शिवाजी हायस्कूल अँड जुनिअर कॉलेज माणगाव 100 टक्के, श्री सिद्धेश्वर हायस्कूल व जुनिअर कॉलेज कुदनुर 88.88, रवळनाथ विद्यालय अँड जुनिअर कॉलेज चंदगड 98.38, राजर्षी शाहू ज्युनिअर कॉलेज शिनोळी बुद्रुक 66.66, सह्याद्री विद्यालय अँड जुनिअर कॉलेज हेरे 98.63 टक्के इतका निकाल लागला आहे.
चंदगड : शंभर टक्के निकाल महाविद्यालये
धनंजय विद्यालय अँड जुनिअर कॉलेज नागणवाडी, छत्रपती शिवाजी हायस्कूल अँड जुनिअर कॉलेज माणगाव
सायन्समध्ये शंभर टक्के निकाल महाविद्यालये -
श्रीमान वाय पी देसाई आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कोवाड, गुरुवर्य जी व्ही पाटील जुनिअर कॉलेज हलकर्णी, सरस्वती विद्यालय जुनिअर कॉलेज कालकुंद्री, सह्याद्री विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज हेरे.
कॉमर्स मधील शंभर टक्के निकाल
धनंजय विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज नागनवाडी, बागिलगे डुक्करवाडी विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज, श्री रवळनाथ विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज चंदगड.
राज्याचा एकूण निकाल 91.25 टक्के
बारावी परीक्षेत राज्याचा एकूण निकाल 91.25 टक्के इतका लागला आहे. यामध्ये कोकण विभागाने बाजी मारली असून कोकण विभागाचा 96.01 टक्के सर्वाधिक निकाल लागला आहे. पुणे विभागाचा 93.34, कोल्हापूर 93.28, औरंगाबाद 91.85, नागपूर 90.35, अमरावती 92.75, नाशिक 91.66, लातूर 90.37, मुंबई 88.13 टक्के इतका निकाल लागला आहे. यंदा मुंबईच्या निकालाचा टक्का घसरल्याचे दिसून आले. एकूणच निकालात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले.

