राजदिप कतावरे तीन तालुक्यात प्रथम
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील साधना ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. यामध्ये राजदिप युवराज कतावरे हा (९४.१७ टक्के) गुण प्राप्त करुन आजरा, चंदगड व गडहिंग्लज या तीन तालुक्यांमध्ये प्रथम आला. तसेच कु. रोहीणी इराप्पा राचान्नावर (८९.१७ टक्के) या विद्यार्थिनीने द्वितीय कमांक, कु.सर्वेश किरण तोडकर (८६.५०टक्के) व मुस्तकीम मुबारक नुलकर (८६.५०) यांनी तृतीय कमांक मिळविला.
कॉमर्स विभागाचा या परिक्षेत १०० टक्के निकाल लागला. या गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेचे सचिव जे.बी.बार्देस्कर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी संचालक अरविंद बार्देस्कर, संचालिका फिलॉन बार्देस्कर, मुख्याध्यापक जी.एस शिंदे, पर्ववेक्षक रफिक पटेल, कॉमर्स विभाग प्रमुख व्हि.पी.भिऊंगडे, सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.



