Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आजरा पोलिसांचा विविध संघटनांच्या वतीने सत्कार



आजरा (प्रतिनिधी): आजरा तालुक्यातील खानापूर येथे पडलेल्या सशस्त्र दरोड्याचा आठरा तासाच्या आत तपास केला व दरोडेखोरांना जेरबंद करून मुद्दे मालासह जप्त करण्याची यशस्वी कामगिरी केल्याबद्दल येथील सर्व संघटनाच्या वतीने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.




सत्कार समारंभासाठी आजरा नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, प्रल्हाद गुरव, हनमंत गुरव, सुमन कांबळे, सुदाम गुरव, जाधव,एकनाथ जाधव, युवराज जाधव, महादेव ढोकरे, राजाराम पोतणीस, कासार कांडगावचे माजी सरपंच शिवाजी गुरव, निवृत्ती मिसाळ यांच्यासह विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.




यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल हारगुडे म्हणाले, जनतेकडून  होणारा हा सत्कार फार प्रेरणादायी आहे. पोलिसांना जनतेतून पाठिंबा मिळत असेल तर पोलीस नव्या उर्मीने काम करतील. पोलिसांविषयी असणारा जनतेतील आकस कमी होवून पोलीस जनतेचे चांगले मित्र होतील. आजरा तालुक्यातील जनतेतून होणारा सत्कार पुरस्कारापेक्षा मोठा आहे.




ते पुढे म्हणाले, या कामगिरीसाठी पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक,  गडहिंग्लज, नेसरी, चंदगड व आजरा पोलिसांनी  विशेष  मेहनत घेतली. पी.एस.आय युवराज जाधव यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. या संपूर्ण टीममुळे दरोडेखोर हाती लागले. आजचा हा सत्कार डायरीत लिहून ठेवणार असून सर्वसामान्य जनतेचे आम्ही मित्र आहोत. तालुक्यातील युवकांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून सरकारी सेवेत यावे. यासाठी गावागावातील वाचनालयांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


       

प्रास्ताविकात काॅ. शिवाजी गुरव यांनी आजरा पोलिसांनी केलेल्या कामाचे कौतुक करत जनतेच्या माध्यमातून चांगल्या कामाचे कौतुक केल्याने इतरांना देखील त्याची प्रेरणा मिळेल यासाठी हा सत्कार करणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल हारगुडे, उपनिरीक्षक युवराज जाधव, हवालदार दत्तात्रय शिंदे, संतोष घस्ती,  सुनील कोईगडे, विशाल कांबळे,  परशुराम कोळी,श्री. तराळ यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार सर्व श्रमिक संघटना  श्रमिक मुक्तीदल, गुरव समाज संघटना, महामार्ग बाधीत संघटना, मुक्तीसंघर्ष समिती, अंनिस, धरणग्रस्त संघटना, भूमीहीन संघटना, जनसेवा सामाजिक संस्था आरदाळ, खानापूर ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आला.




पोलिसांचे मनोबल वाढवणे, त्याचे कौतुक करणे, सहकार्य करणे आवश्यक आहे असे मत यावेळी नारायण भंडागे, नामदेव गुरव, शिवाजी इंगळे यांनी आपल्या मनोगतून व्यक्त केले. आभार संजय घाटगे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.