Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजमध्ये हिरण्यकेशी नदीत विवाहितेची आत्महत्या


गडहिंग्लज (प्रतिनिधी): 
तालुक्यातील हरळी खुर्द येथील विवाहितेने गडहिंग्लज मधील हिरण्यकेशी नदीत आत्महत्या केली. अश्विनी राहुल मुसळे( वय ३५) असे या विवाहितेचे नाव आहे. आत्महत्या मागील नेमके कारण मात्र समजू शकलेले नाही.



याबाबत अधिक माहिती अशी की, अश्विनी मुसळे ह्या गडहिंग्लजमधील डॉक्टर कॉलनीत राहत होत्या. त्यांचे मूळ गाव हरळी खुर्द आहे. शुक्रवारी मध्यरात्री त्या घरातून बाहेर पडल्या होत्या. शनिवारी सकाळी हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पुलाच्या पूर्वेकडील बाजूस त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. गडहिंग्लज नगरपालिकेच्या अग्निशमन कर्मचाऱ्यांनी अश्विनीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला. मयत अश्विनी यांच्या पश्चात  पती, दोन मुले असा परिवार आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.