Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ठाकरे गट युवा सेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची गडहिंग्लजला बैठक



गडहिंग्लज (प्रतिनिधी): युवा सेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ युवासेना जिल्हा प्रमुख अवधुत पाटील व जिल्हा समन्वयक जयसिंग टिकले यांच्या मार्गदर्शनाखाली गडहिंग्लज येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडला.




या बैठकीत कोल्हापूर ग्रामीणमध्ये युवासेना वाढीसाठी 'गाव तिथे युवासेना घर तिथे युवासैनिक' राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. संघटना वाढीसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख अवधुत पाटील व जिल्हा समन्वयक जयसिंग टिकले यांनी मार्गदर्शन केले. आगामी काळात नव्या जोमाने व ताकदीने काम करून संघटना बळकट करण्याचा निर्धार करण्यात आला. युवा सेनेचे महेश पाटील यांची आजरा खरेदी विक्री संघाच्या संचालक पदी निवड झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला.




बैठकीस जिल्हा समन्वयक जयसिंग टिकले (कागल), जिल्हा समन्वयक सुजित पाटील (चंदगड), उपजिल्हा युवा अधिकारी महेश पाटील (चंदगड), उपजिल्हा युवा अधिकारी समीर देसाई(कागल),उपजिल्हा युवा अधिकारी (राधानगरी) प्रसाद पिलारे (राधानगरी), तालुका युवा अधिकारी सागर हेब्बाळे (गडहिंग्लज), तालुका युवा अधिकारी (आजरा) राजकुमार भोगण (आजरा ), तालुका युवा अधिकारी (आजरा) रोहित डावरे (आजरा ), तालुका युवा अधिकारी (कागल) राजकीरण सावडकर (कागल), तालुका समन्वयक (भुदरगड) दत्तात्रय डावरे (भुदरगड), तालुका समन्वयक अवधूत पाटील(कागल), सोशल मीडिया समन्वयक (कागल) शकील मुल्ला (कागल), सोशल मीडिया समन्वयक (चंदगड) संदेश वाघराळकर (कागल), सोशल मीडिया समन्वयक सतीश माणगावकर (कागल), राजवर्धन कोरवी, सुमित कोरवी, तेजस घेवडे, ओंकार कोरवी यांच्यासह युवासैनिक उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.