पाठपुराव्यातून गावात आतापर्यंत तब्बल पाच कोटींची विकास कामे
खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून निधी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते दीपक पुजारी, नूतन ग्रामपंचायत सदस्य श्रीमंत ऊर्फ दिनकर पुजारी, युवा नेते बसवराज पुजारी यांनी सतत पाठपुरावा करत नंदनवाड गावात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. आतापर्यंत गावात तब्बल ५ कोटींची विकासकामे खेचून आणण्यात त्यांना यश आले आहे.
या विकास कामांमध्ये पाटील गल्ली कॉंक्रीटीकरण ५ लाख, पाण्याच्या टाकीजवळ कॉंक्रीटीकरण, रेणुका गल्ली कॉंक्रीटीकरण, लक्ष्मी मंदिर परिसर डांबरीकरण, जाधव वसाहत डांबरीकरण, सतबा जाधव वसाहत कॉंक्रीटीकरण, व गावातील आरसीसी गटर बांधकामसाठी २० लाख रूपयांचा निधी आमदार राजेश पाटील यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमातुन मिळाला. तसेच गावातील मुख्य ओढयावर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधणीकरिता आमदार राजेश पाटील यांच्याकडून १ कोटी १२ लाख रुपयांचा निधी. जल जीवन मिशन अंतर्गत खासदार संजय मंडलिक , आमदार राजेश पाटील यांच्या सहकार्याने सध्या ६८ लाख रुपयांचे काम सुरु आहे. त्याचबरोबर तांडा वस्तीसाठी १ कोटी तर नवीन पुलाचे बांधकाम करणे यासाठी १ कोटी निधी मिळाला आहे. नंदनवाड येथील पाझर तलावसाठी १ कोटी रुपयांचा निधी मिळाल्यामुळे गावचा चेहरामोहरा बदलण्यास मदत झाली आहे.


