पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल उद्या गुरुवार दिनांक 25 मे रोजी जाहीर केला जाणार आहे. दुपारी दोन वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे. गेल्या काही दिवसापासून विद्यार्थ्यांसह पालकांचे निकालाच्या तारखेकडे लक्ष लागून राहिले होते.

