Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सत्यमेव सेवा फौंडेशनतर्फे उत्तुर येथे विविध मान्यवरांचा पुरस्काराने सन्मान



आजरा (प्रतिनिधी): सत्यमेव सेवा फौंडेशन, मुंबई यांच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा विविध पुरस्काराने सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम नवकृष्ण व्हॅली उत्तुर येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फौंडेशनचे संस्थापक सुनील बोरनाक होते. यावेळी अध्यक्ष संदीप मेंगाने,  उपाध्यक्ष सतीश पाटील,  खजिनदार रामचंद्र भोसले यांची उपस्थिती होती.




प्रारंभी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन झाले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक सुनील बोरनाक यांनी केले. त्यानंतर तानाजी पावले, सचिन परीट, संतोष शिवणे, गुरुप्रसाद जोशी, टी.एस.गडकरी, प्रा.संजय खोचारे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सत्कार समारंभ संपन्न झाला.




यावेळी उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. यामध्ये जान्हवी अवधूत पाटील - सत्यमेव गिर्यारोहक पुरस्कार (भुदरगड), मंगेश पुजारी - सत्यमेव रक्तदाता पुरस्कार (नर्सोबावाडी), सुशांत आपके - सत्यमेव शौर्य पुरस्कार (आजरा), डॉ. शिवाजी महाराज पन्हाळे - सत्यमेव सेवारत्न पुरस्कार (भुदरगड), शंकर केंगार - सत्यमेव कलारत्न पुरस्कार (कागल), गुरुप्रसाद जोशी - सत्यमेव समाज गौरव पुरस्कार (कागल), दिनकर खवरे सर - सत्यमेव विशेष योगदान पुरस्कार (गडहिंग्लज), अर्चना तोंदले मॅडम - सत्यमेव आदर्श शिक्षिका पुरस्कार, संजय खोचारे सर - सत्यमेव पत्रकारिता पुरस्कार, अंजू तूरंबेकर - सत्यमेव क्रीडारत्न पुरस्कार, रामा लाखे - सत्यमेव कोविड योद्धा पुरस्कार. यांचा समावेश आहे.



यावेळी बोलताना सत्यमेव सेवा फौंडेशनचे संस्थापक सुनील बोरनाक म्हणाले,  समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या निर्मळ भावनेतून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे सत्यमेव सेवा फौंडेशन मुंबईत स्थापन झालेली सेवाभावी संस्था आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करताना विशेष आनंद होत आहे. 


या सर्व मान्यवरांचा प्राचार्य रामकृष्ण मगदूम, दत्तात्रय चौगुले, ग्रामपंचायत बामणीचे सरपंच दिनकर खवरे, किरण सावंत, अनिल जाधव, सचिन परीट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्मृतिचिन्ह, दिनकर खवरे लिखित कथारत्न व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. आभार फौंडेशनचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन दिनकर खवरे यांनी केले.



कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सत्यमेव फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी प्राचार्य रामकृष्ण मगदूम, दत्तात्रय चौगले, सरपंच  दिनकर खवरे, किरण चव्हाण, अनिल जाधव, अवधुत पाटील यांच्या इतर उपस्थित  होते.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.