Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'एस. जी. एम. टॅलेन्ट हन्ट' स्पर्धा उत्साहात; उत्स्फूर्त प्रतिसाद



गडहिंग्लज (प्रतिनिधी): संत गजानन महाराज अभियांत्रिकी  महाविद्यालयामार्फत 'एस. जी. एम. टॅलेन्ट हन्ट' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये आजरा, गडहिंग्लज, चंदगड, इंचलकरंजी, निपाणी व बेळगांव येथील बारावी सायन्सच्या दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली.




विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सामाईक (MHT-CET) परिक्षेचा सराव व्हावा व संगणक प्रणाली वापरण्याचा अनुभव मिळावा हा या स्पर्धेचा मुख्य हेतू होता. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी प्रा. एस. जे. पाटील (तज्ञ, फिजीक्स) यांनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी प्रा. बी. जी. मापारी (तज्ञ, गणित) व प्रा. डॉ. अमोल पाटिल यांनी केमिस्ट्री या विषयांवर मार्गदर्शन केले. या विषयावरील व्याख्यान हे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले. प्राचार्य डॉ. एस. एच. सावंत यांनी 'अभियांत्रीकी मधील भविष्यातील संधी' यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्रा. एम. जी. मुल्ला यांनी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.




या स्पर्धेमध्ये कु. वेदांत इंचनाळकर याने प्रथम क्रमांक तर कु. वैभव गुरव याने द्वितीय क्रमांक पटकाविला. स्पर्धेसाठी एकूण दोनशे गुणांची प्रश्नावली होती. त्यामध्ये फिजिक्स व केमिस्ट्री पन्नास गुण तर गणितासाठी शंभर गुणांचे प्रश्न होते. स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पारितोषिकाचे वितरण करण्यात आले या स्पर्धेसाठी समन्वयक म्हणून प्रा.अमरसिंह फराक्टे, प्रा. सचिन सनदी, प्रा. डॉ. अमोल माने यांनी काम पाहिले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. आण्णासाहेब चव्हाण, विश्वस्त डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, सेक्रेटरी ॲड. बाळासाहेब चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.