Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध

सदानंद हत्तरकी गट सहा, राष्ट्रवादी चार, भाजप तीन व जनता दलाला दोन जागा


गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुका खरेदी-विक्री संघाची निवडणूक सर्वपक्षीय नेते मंडळींच्या एकमतामुळे शुक्रवारी बिनविरोध झाली. सदानंद हत्तरकी गट सहा, राष्ट्रवादी चार, भाजप तीन व जनता दल दोन असे पक्षीय बलाबल आहे. गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समिती पाठोपाठ तालुका संघाची निवडणूक देखील बिनविरोध करण्यास सर्व पक्षीय नेतेमंडळींना यश आले आहे. तालुका संघाच्या संचालक मंडळात कल्याणी देसाई, राजेंद्र मुन्नोळी, अरुण मिरजे, प्रतिमा धुरे, संगीता पाटील या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक अमित गराडे यांनी काम पाहिले. 



बिनविरोध निवड झालेले संचालक पुढील प्रमाणे- संस्था प्रतिनिधी अशोक पाटील,  तम्माणा पाटील, शशिकांत चोथे, कृष्णराव वाईंगडे, मल्लाप्पा कल्याणी, सुरेश देसाई, राजेंद्र मुन्नोळी, व्यक्ती प्रतिनिधी- अरुण मिरजे, रमेश पाटील, मलगोंडा पाटील, इतर मागास - बाळकृष्ण परीट, भटक्या विमुक्त जाती जमाती- रामाप्पा करीगार, अनुसूचित जाती जमाती - काशिनाथ रवेदार, महिला राखीव - प्रतिमा धुरे, संगीता पाटील. हिरा शुगरचे संचालक सोमगोंडा आरबोळे यांनी बिनविरोध सर्व उमेदवारांची यादी जाहीर केली.


यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, गडहिंग्लज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, जिल्हा बँकेचे संचालक  संतोष पाटील, सदानंद हत्तरकी, संग्रामसिंह कुपेकर, अमर चव्हाण, विद्याधर गुरबे, बाबासाहेब पाटील, जयसिंग चव्हाण, उदयराव जोशी, दिग्विजय कुराडे, जयकुमार मुन्नोळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.