Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'शिवराज'च्या विद्यार्थ्यांना दाखल्यांसाठी लागणारी कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष शिबिर



गडहिंग्लज (प्रतिनिधी):येथील शिवराज महाविद्यालयात आजी-माजी विद्यार्थ्यांना जुनी कागदपत्रे, पासपोर्ट, जातीचे दाखले, त्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रे काढताना होणारी धावपळ व येणाऱ्या अडचणी यांचा विचार करून संस्था सचिव प्रा. अनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनानुसार रविवार दि. २७ व २८ मे रोजी महाविद्यालयामार्फत विशेष सेवा देण्यात येणार आहे.



विशेष सेवेंतर्गत टी.सी., शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड सर्टीफिकेट, वर्तणुकीचा दाखला, जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे यासह अन्य आवश्यक दाखले सकाळी ९.०० पासून देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना त्वरीत सेवा देण्याच्या उद्देशाने हा विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. संतोष शहापूरकर यांनी दिली. शिवराज विद्या सुकलातील आजी- माजी विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ.एस.एम. कदम यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.