Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

चिंचेवाडीतील संत गजानन महाराज रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया



गडहिंग्लज (प्रतिनिधी): चिंचेवाडी येथील संत गजानन महाराज रुग्णालयात तालुक्यातील एका एकावन्न वर्षीय महिलेच्या गळ्याभोवती वाढलेली जवळपास अर्धा किलोच्या थॉयरॉईडची गाठ बाहेर काढण्यात येथील डॉक्टरांना यश आले. गुंतागुंतीची व अतिशय अवघड जोखीमेची शस्त्रक्रिया करून महिलेला जीवदान दिले. यामुळे येथील डॉक्टरांचे सर्वत्र कौतूक होत आहे.




सदरच्या महिलेला गेल्या वीस वर्षांपासून या गाठीचा त्रास होता व  वाढणाऱ्या या गाठीमुळे सध्या तीला श्वास घेणेही मुश्कील व त्रासदायक वाटत होता. अशा अवस्थेत एक आव्हान समजून येथे उपचार करण्याचे ठरवले. महत्त्वाचे म्हणजे रुग्णाला श्वास घेणेही त्रासाचे वाटत असल्यामुळे  भूल देणेही अत्यंत धोकादायक होते. पण प्रदीर्घ अनुभव असलेल्या भुलतज्ञ, डॉ. सुरेखा चव्हाण यांनी यशस्वीपणे भुल दिल्यानंतर रुग्णालयातील कॅन्सर तज्ञ डॉ. आदेश पालेकर व डॉक्टरांच्या टिमने  दोन तासाच्या अथक प्रयत्नांनी शस्त्रक्रिया करुन गाठ बाहेर काढली.



शस्त्रक्रिया यशस्वितेसाठी डॉ.यशवंत चव्हाण, डॉ. प्रतिभा चव्हाण, डॉ.राजदिप होडगे, डॉ.माधव पटाडे व इतर परिचारीकेच्या मदतीने यशस्वी झाले. "सध्या या रुग्नाची प्रकृती चांगली असून शस्त्रक्रियेपूर्वी होत असलेला त्रासही कमी झाला आहे. रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर व तत्पर कर्मचारी यामुळेच अवघड शस्त्रक्रिया यशस्वी झाली व रुग्नाला जीवदान मिळाला. अल्पावधीतच या रुग्णालयात सर्व प्रकारच्या रुग्णाना अत्यल्प दरातील मल्टीस्पेशालिटी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. गरजू रुग्णानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वस्त डॉ.संजय चव्हाण यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.