Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तब्बल ३६ वर्षानंतर नरेवाडीतील महात्मा गांधी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

वयाच्या बावन्नाव्या वर्षी माजी विद्यार्थ्यांचे 'गेट -टूगेदर'                   ‌




गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी भाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या महात्मा गांधी हायस्कूल, नरेवाडी येथील सन 1987 मधील दहावीचे माजी विद्यार्थी 36 वर्षानंतर वयाच्या बावन्नाव्या वर्षी एकत्र येऊन 'डार्क फॉरेस्ट रिसॉर्ट' आंबोली या ठिकाणी स्नेहमेळावा साजरा केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदनवाड गावचे सुपुत्र, पंचक्रोशीतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते, कोल्हापूर जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक दिपक पुजारी होते.


     


सर्व माजी विद्यार्थी यांनी दीपप्रज्वलन करून स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमास सुरुवात केली. प्रत्येक जण आपली ओळख करून देऊन मनोगत व्यक्त केले .


दोन दिवसाच्या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी भजन, कीर्तन, वेगवेगळ्या प्रकारची गाणी, फणी -गेम्स तसेच शालेय जीवनातील खेळाचा आनंद लुटून फूल-टू धम्माल केली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती सुमती जाधव व सूत्रसंचालन आनंदकुमार निलवे, मुकुंद मनवाडकर यांनी करून रंगत आणली.  आभार शिवाजी पाटील यानी मानले.


या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दयानंद गोडसे, संजय कावनेकर, अनिल शेलार, निरंजन देसाई , भरमा कलगोंडा, मनोहर कदम,  सुभाष पाटील, संजय बिरंजे,  संगिता बागेवाडी यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.