Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नंदनवाडच्या श्री महालक्ष्मी देवीची उद्यापासून पाच दिवस यात्रा

विविध धार्मिक, मनोरंजन कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन




गडहिंग्लज (प्रतिनिधी): नंदनवाड येथील श्री महालक्ष्मी देवीची यात्रा दिनांक ९ ते १३ मे या कालावधीत संपन्न होत आहे. यानिमित्त  गावात विविध धार्मिक,  मनोरंजनाचे कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीने योग्य प्रकारे नियोजन केले असून देवीच्या स्वागतासाठी नंदनवाडकर सज्ज झाले आहेत.


मंगळवार दिनांक ९ रोजी दुपारी २ ते रात्री ११ पर्यंत देवीची ओटी भरणे कार्यक्रम, बुधवार दिनांक १० रोजी रात्री अकरा वाजता सांगाप्पा बाळाप्पा कन्नड नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.


गुरुवार दिनांक ११ रोजी सकाळी आठ वाजता हातात कासरा धरून बैल पळविण्याच्या शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे 1501, 1001, 701   अशी आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.


सकाळी नऊ वाजता बसून घोडा पळविण्याच्या शर्यती  आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे 1501, 1001, 701 अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. 


सकाळी साडेनऊ वाजता पाढा बैल शर्यतींचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे 7001, 5001, 3001 अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.



सकाळी दहा वाजता बैल घोडागाडी शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 10001, 7001, 5001 अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. 


सकाळी साडेदहा वाजता घोडा गाडी शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 5001, 3501, 2501 अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.


सकाळी साडेअकरा वाजता भव्य जनरल बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 15001, 10001, 7001 अशी आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेत भाग घेण्यासाठी इच्छुकानी दिनकर पुजारी, विठ्ठल पाटील, बाळासाहेब सुतार, शटगोंडा पाटील, वसंत राजगोळे, संतोष जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  


गुरुवार दिनांक ११ रोजी रात्री अकरा वाजता शिवगंधार कोल्हापूर प्रस्तुत मराठमोळ गाणं महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा गीत नृत्याविष्कार कार्यक्रम आयोजित केला आहे.


शुक्रवार दिनांक १२ रोजी सकाळी दहा ते दुपारी चार पर्यंत दंडवत कार्यक्रम पार पडणार आहे.  रात्री दहा वाजता स्टार ऑर्केस्ट्रा कोल्हापूर यांचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.


शनिवार दिनांक १३ रोजी सकाळी हक्कदार रुद्राप्पा देसाई यांच्याकडून पालवा सोडण्याचा कार्यक्रम व सायंकाळी चार वाजता  लक्ष्मी खेळविणे व यात्रेचा समारोप होणार आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.